भाजपा शिक्षक आघाडीची मागणी : शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा यासह शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी भारतीय जनता पक्षाच्या शिक्षक आघाडीने 8 सप्टेंबरला राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनाचा एक भाग म्हणून कराड तालुक्यातील शिक्षकांनी गटशिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. समाजातील महत्वाचा घटक असूनही शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत … Read more

चाफळची केंद्रशाळा जिल्ह्यात प्रथम क्रमांकाची शाळा करणार : राजेश पवार

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी चाफळची केंद्रशाळा ही जिल्ह्यात प्रथम क्रमांकाची शाळा म्हणून कशी नावारुपास येईल, यासाठी प्रयत्न करणार आहे. कोरोनाच्या महामारीने अनेक कुटुंबे अक्षरशः उध्वस्त झाली आहेत, यासाठी शासन नियमांचे पालन करीत कोरोनाला वेशीबाहेर ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती राजेश पवार यांनी केले. पाटण तालुक्यातील चाफळ येथील श्री … Read more

वैशाली खाडे जिल्हास्तरीय आदर्श पुरस्काराने सन्मानित

दहिवडी प्रतिनिधी | आकाश दडस पाच सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून सातारा जिल्हा परिषद सातारा यांच्या मार्फत दिला जाणारा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2021 सौ. वैशाली मोहन खाडे उपशिक्षिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रानमळा ( दहिवडी) यांना सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम 6 सप्टेंबर 2021 रोजी पार पडला आदर्श शिक्षिका सौ. वैशाली खाडे यांना सन्मानित … Read more

जिल्हास्तर : शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना सन 2020-21 व 2021-22 मधील पुरस्कार जाहीर

Satara ZP

सातारा | भारताचे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमत्त 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. प्रत्येक व्यक्तीच्या जडणघडणीमध्ये शिक्षक हा अत्यंत महत्वाचा दुवा असतो. दरवर्षी शिक्षक दिनाच्या दिवशी ज्या शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. त्यांचा जिल्हा स्तरावर पुरस्कार देवून गौरव करण्यात येतो. कोविड -19 रोगाच्या पार्श्वभूमीवर सन 2020-20 चे … Read more

तब्बल 2062 जागांसाठी शिक्षक भरती; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा

varsha gaikwad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याच्या शिक्षक विभागात तब्बल 2062 जागांसाठी भरती असून त्यासाठी शिक्षण विभागाने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आलेल्या उमेदवारांपैकी 3902 उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार असल्याची घोषणा राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. शिक्षक पदभरती:पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ५६१ खाजगी व्यवस्थापनाच्या २०६२ रिक्त पदांसाठी १५१२३ पसंतीक्रमावर ३९०२ उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस करण्यात येत आहे. उमेदवारांना मुलाखतीसाठी हार्दिक … Read more

मलकापूर येथील कन्याशाळेत यशस्वी विद्यार्थींनी, पालकांचा सत्कार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या कन्याशाळा मलकापूर एसएससी परीक्षेतील, एन.एम.एम.एस व शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थींनी व त्यांच्या पालकांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमास भास्करराव मोहिते, उद्योजक दिलीप पाटील, संस्थेचे सचिव शेतीमित्र अशोकराव थोरात, शाळेच्या मुख्याध्यापिका सुलोचना भिसे, पर्यवेक्षक सुरेश राजे, अनिल शिर्के, अरूणा कुंभार, जीवन मोहिरे, प्रकाश पाटील, प्रमिला शेलार, … Read more

Fresher इंजिनिअरांसाठी WIPRO मध्ये बंपर भरती जाहीर, पगार तब्बल 3 लाख 50 हजार; जाणुन घ्या अर्ज प्रक्रिया

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : नुकतेच इंजिनिअरिंगचे शिक्षण पुर्ण केलेल्या इंजिनिअर्सकरता विप्रोकडून एक खास संधी उपलब्ध करण्यात आली आहे. Wipro Elite National Talent Hunt द्वारे विप्रो कंपनीकडून बंपर भरती होणार आहे. नुकतेच इंजिनिअरिंगचे शिक्षण पुर्ण करुन नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण तरुणींसाठी यामुळे चांगली संधी निर्माण झाली आहे. 2022 मध्ये आपला अभ्यासक्रम पुर्ण करणारे इंजिनिअरिंग विद्यार्थी याकरता … Read more

विद्यापीठा संदर्भात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंतांनी केली ‘हि’ महत्वाची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात मराठी भाषेबद्दल अभिमान बाळगणारी अनेक लोक आहेत. राज्यात मराठी भाषेचा विकास व संशोधनाला चालना मिळावी म्हणून राज्य सरकार कडून प्रयत्न केले जात आहे. या अनुषंगाने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज महत्वाची घोषणा केली. “राज्यात मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना करण्यात येणार असून विद्यापीठासाठी दहा दिवसांत एक समिती स्थापन … Read more

कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने पुन्हा 42 शाळा बंद

School will started

औरंगाबाद |  जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे 42 शाळा पुन्हा बंद केल्या आहेत. सध्या ग्रामीण भागातील आठवी ते बारावीच्या 75 टक्के शाळा सुरू असून, विद्यार्थ्यांची 50 टक्के उपस्थिती असल्याचे शिक्षण विभागाच्या संकलित आकडेवारीतून दिसून येत आहे. खबरदारी म्हणून 42 शाळा बंद केल्या आहेत. मात्र, पुन्हा काही शाळांची पाहणी करून शाळा सुरू करण्यात येतील, असे शिक्षण … Read more

हिंगनोळेत घरोघरी शाळा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्यात समाधानाचे वातावरण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील हिंगनोळे येथे सुरू असलेल्या घरोघरी शाळा या उपक्रमांतर्गत  विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या घरातच तयार करण्यात आलेल्या स्वतंत्र शाळेचे उद्घाटन विद्यार्थी व पालक यांच्या हस्ते अनोख्या पद्धतीने उत्साहात पार पडले. माण तालुक्यातील जि. प. प्राथ. शाळा वडगावचे मुख्याध्यापक संजय खरात यांची संकल्पना असलेल्या घरोघरी शाळा हा उपक्रम हिंगनोळे जि. प. शाळेच्या … Read more