व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

कोडोलीतील हायस्कूलास शिक्षक आमदार फंडातून शैक्षणिक साहित्य

कराड | कोडोली येथील भारती विद्यापीठच्या हौसाबाई विठ्ठलराव पाटील प्रशाला कोडोली (ता. कराड) येथील हायस्कूलला शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी आमदार फंडातून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रम महात्मा गांधी विद्यालय उंब्रज येथे प्रमुख पाहुणे शिक्षक आमदार जयंत आसगावकर ( पुणे विभाग शिक्षक मतदार संघ) यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य पोतदार ए. जी. हे होते. तर कराड पाटण तालुक्यातील शाळा मधील मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. कोडोली हायस्कूलला थ्री इन वन प्रिंटर देण्यात आला. यावेळी हौसाबाई विठ्ठलराव प्रशाला कोडोली या शाळेस आमदार जयंत आजगावकर यांच्या शुभहस्ते थ्री इन वन प्रिंटर शिक्षक मोरे आय.जे.यांनी स्वीकारला.

प्रशालेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थ्यांनी तसेच पालक, ग्रामस्थ यांनी शाळेस बहु उपयोगी थ्री इन वन प्रिंटर दिल्याबद्दल आमदार जयंत आसगावकर यांचे आभार मानले.