हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। अनेक वेळा असे होते कामाचा लोड आणि आपल्या गरजा भागविण्यासाठी करावे लागणारे कष्ट यामुळे आपल्या शरीराकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. बहुतांश लोक हे रात्री जेवण न करता झोपतात . काही लोक आपले वजन वाढेल या भीतीने रात्रीचे पदार्थ खात नाहीत. तुमची काहीच न खाता झोपण्याची चूक तुमच्या शरीराला जास्त महागात पडू शकते. रिकाम्या पोटी झोपल्याने अनेक आजरांचा सामना करावा लागतो. त्यामुळे उपाशी पोटी झोपणें किती नुकसानकारक ठरत आहे याची माहिती घेऊया .
रिकाम्या पोटी झोपल्याने दुसऱ्या दिवशी थकवा जाणवायला सुरुवात होते. तुमचा सगळा दिवस हा कष्टदायक जाऊ शकतो.
— ज्यांना रात्री उपाशी पोटी झोपण्याची सवय असते. त्यांच्या चयापचय क्रियेवर मोठ्या प्रमाणत फरक जाणवायला सुरुवात होते.
–जर तुम्ही उपाशी पोटी झोपत असाल तर तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल ची पातळी वाढण्यास सुरुवात होते. त्यामुळे थायरॉईड ची पातळी बिघडते. त्यामुळे अनेक आजरांना आमंत्रण दिले जाते.
— ज्या लोकांना असे वाटते की आपण रात्री कमी जेवल्याने आपले वजन कमी होते तर अजिबात नाही. उपाशी पोटी झोपल्याने वजन कमी होत नाही उलट त्याचे नाहक आरोग्याला त्रास होतो.
—रिकाम्या पोटी झोपल्याने रात्रीची झोप सुद्धा पूर्ण होत नाही. पोट रिकामे असल्याने अनेक वेळा जाग येते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’