नवी दिल्ली | पंतप्रधान कौशल्य विकास योजना ही केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे. 2015 मध्ये या योजनेची सुरुवात करण्यात आली होती. रोजगाराच्या दृष्टीकोनातून कौशल्य मिळवून देण्यासाठी योजना बनवली गेली होती. कमी शिक्षण घेतलेल्या अथवा मधूनच शिक्षण सोडलेल्या युवकांना कौशल्य मिळवून देण्यासाठी योजना बनवून दिली गेली होती. या योजनेमध्ये 3, 6 आणि 12 महिन्याचे रजिस्ट्रेशन असते. या योजनेअंतर्गत कोर्स केल्यानंतर सर्टिफिकेट दिले जाते. संपूर्ण देशभरामध्ये हे सर्टिफिकेट वैद्य मानले जाते. 2022 पर्यंत या योजनेअंतर्गत 40 कोटी लोकांना प्रशिक्षण देण्याचे ध्येय ठेवले आहे. या प्रशिक्षणानंतर व्यवसायासाठी वा रोजगारासाठी कर्ज मिळण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.
2020-21 या वर्षामध्ये प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 3.0 मध्ये आठ लाख तरुणांना सद्ध्या उद्योगाचे आणि रोजगारासाठीचे प्रशिक्षण द्यायचे उद्दिष्ट आहे. यासाठी सरकार 948 कोटी रुपये खर्च करत आहे. या योजने संदर्भात माहिती देताना केंद्र शासनाने जाहीर केले की, तिसऱ्या टप्प्यामध्ये 28 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांमधील जवळपास 717 जिल्ह्यामध्ये ही योजना सुरू करण्यात आली आहे. तसेच, तिचे लाभार्थी निवडण्याचे काम सुरु आहे. या योजनेमध्ये नाव नोंदवायचे असेल तर http://pmkvyofficial.org या वेबसाईटवर जाऊन आपली माहिती भरणे आवश्यक आहे. त्या नंतर कुठला कोर्स घ्यायचा तो निवडणे आवश्यक आहे.
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेमध्ये कंस्ट्रक्शन, हार्डवेअर, फुड प्रोसेसिंग, फर्निचर फिटिंग, हँडीक्राफ्ट, जेम्स, ज्वेलरी टेक्नॉलॉजी सोबत, जवळपास 40 टेक्निकल कोर्सेस शिकवले जाणार आहेत. एक आवडीचा विषय आणि त्यासोबत एक विषय निवडावा लागेल. ही माहिती भरल्यानंतर आपल्याला ट्रेनिंग सेंटर निवडणे आवश्यक आहे. या कोर्सेससाठी कुठलीही द्यावी लागत नाही. याउलट केंद्र सरकार आठ हजार रुपये देते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.