अनैतिक संबंधात अडसर ठरल्याने आठ वर्षीय चिमुरड्याची गळा आवळून हत्या

murder
murder
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भिवंडी : हॅलो महाराष्ट्र – भिवंडीमध्ये अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्यामुळे एका आठ वर्षीय चिमुरड्याची गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. खानावळी साठी घरी येणाऱ्या कामगाराचे आठ वर्षाच्या मुलाच्या आईशी अनैतिक संबंध होते. भिवंडी तालुक्यातील कारिवली गावच्या हद्दीतील एका इमारती मधील तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या कुटुंबाचा ८ वर्षाचा मुलगा हा गुरुवारी दुपारपासून बेपत्ता झाला होता. त्याची सगळीकडे शोधाशोध केली पण पण त्याचा कुठेच पत्ता न लागल्याने त्याच्या वडिलांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दिली होती. यानंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून मुलाचा शोध सुरू केला असता शुक्रवारी पहाटेच्या सुमारास आठ वर्षीय चिमुरड्याचा गळा आवळून खून केल्याच्या अवस्थेत मृतदेह त्याच इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील एक बंद खोलीत आढळला होता.

यानंतर भोईवाडा पोलिसांनी पंचनामा करून अज्ञात आरोपीच्या विरोधात खून आणि अपहरणाचा गुन्हा करून तपासाला सुरुवात केली. तेव्हा त्या परिसरातील संशयित जितेंद्र मधेशिया याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने हत्या केल्याचे कबुल केले. आरोपी जितेंद्र हा हत्या केलेल्या कुटुंबाकडे खानावळ लावून जेवण करण्यासाठी येत होता. त्यावेळी तो हत्या झालेल्या मुलाच्या आई सोबत शारिरीक लगट करीत असल्याची माहिती या मुलाने आपल्या वडिलांना दिली यानंतर त्यांच्यात शाब्दिक चकमक होऊन त्याची खानावळ बंद केली.

मुलाने आपले कारस्थान सांगितल्याने आपले बिंग फुटले, याचा राग मनात ठेवून जितेंद्रने आठ वर्षीय चिमुरड्यास खेळायच्या बहाण्याने बोलवून आपल्या सोबत चौथ्या मजल्यावर घेऊन गेला व त्या ठिकाणी त्याची गळा आवळून हत्या केली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक एस एन चव्हाण यांनी केला आहे. चिमुरड्याची हत्या करणारा जितेंद्र मधेशिया याला पोलिसांनी अटक करून त्याला भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्यास २१ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.