हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि कन्या रोहिणी खडसेही आहेत.यावेळी एकनाथ खडसे यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे. ‘मी 40 वर्ष राजकारण केलं, पण बाईला समोर करून मी राजकारण केलं नाही. तो माझा स्वभाव नाही. मी काही लेचापेचा नाही.’ अशा शब्दात खडसेंनी भाजपवर घणाघात केला आहे.
एकनाथ खडसे पुढे म्हणाले, ‘संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं की माझा किती छळ झाला, अन्याय झाला. मी विधानसभेतही विचारलं की माझा गुन्हा काय? जर माझा काही गुन्हा असेल तर त्याचे कागदपत्र दाखवा असंही म्हटलं. मी खूप संघर्ष केला. हा संघर्ष केवळ भाजपमध्येच नाही, तर अगदी मंत्रिमंडळातही केला’ अशी टीका खडसे यांनी केली आहे.
कटप्पाने बाहुबलीला का मारलं, याचं उत्तर समजलं नाही पण टायगर अभी जिंदा है – जयंत पाटलांनी भाजपला फटकारले
वाचा सविस्तर-👉🏽https://t.co/H7nskRbfJj@Jayant_R_Patil @PawarSpeaks #HelloMaharashtra @NCPspeaks @MumbaiNCP @EknathGKhadse— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 23, 2020
आयुष्याचे ४० वर्ष भाजपमध्ये काम केलं. पण विधानसभेत माझी किती बदनामी झाली, छळ केला गेला हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं. माझं काय चुकलं? या प्रश्नाचं उत्तर मला या क्षणापर्यंत मिळालं नाही.असंही खडसे म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’