हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जेष्ठ नेते एकनाथ खडसेंनी हाती घड्याळ बांधल्यानंतर आता एकनाथ खडसे विरुद्ध भाजप असा वाद रंगल्याचं पाहायला मिळतं. खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आज पुन्हा एकदा भाजपवर टीका केली आहे. मला थांबवण्यासाठी कोणी का आग्रह केला नाही? एकदा चंद्रकांतदादा पाटलांचा फोन आला होता. पण, त्यांना माझी गरज वाटली नाही त्यामुळे त्यांनी फार आग्रह केला नाही असे खडसे म्हणाले.
खडसेंना राष्ट्रवादीमध्ये लिमलेटची गोळी मिळते की कॅटबरी चॉकलेट मिळतं हे आम्हाला पण पाहायचं आहे अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. त्यावर खडसेंनी चंद्रकांत पाटलांवर पलटवार केला आहे. ‘भाजपामध्ये मोठ्या संख्येनं लोक आलेत. प्रविण दरेकर आणि राधाकृष्ण विखे यांना काय चॉकलेट देवून आणलं आहे का? असा थेट सवाल खडसेंनी विचारला आहे.
खडसे पुढे म्हणाले की, ‘अजित पवारांविरोधात गाडीभर पुरावे जे गाडीभर नव्हतेच ते घेवून ज्यावेळी भाजपाच्या नेत्यांनी मोर्चा काढला त्यावेळी मी मोर्चात नव्हतो. देवेंद्र फडणीसांनी पहाटे अजितदादांसोबत शपथ घेतली त्यानंतर लगेच त्यांना क्लिनचीट दिली आणि आता तेच लोक आरोप करत’ असल्याच खडसे म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’