होय, मला ईडीची नोटीस मिळाली ; एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | होय, मला ईडीची नोटीस मिळाली अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिली. त्यामुळे खडसेंना ईडीची नोटीस आली आहे या बातमीवर खुद्द एकनाथ खडसे यांनी आता शिक्कामोर्तब केलं. ईडीची नोटीस आल्यानंतर मला महाराष्ट्रातून फोन येत आहेत. मला सहानुभूतीच मिळत आहे. लोकांना हे आवडत नाही”, असं एकनाथ खडसे म्हणाले.

ईडीची नोटीस आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरातून मला जे फोन येत आहे त्यातून सहानुभूती व्यक्त केली जात आहे. लोकांना असं वाटते की हा एक प्रकारचा माझ्यावर अन्याय आहे. वारंवार चौकशा लोकांना आवडलेल्या दिसत नाहीत, पण काही निर्णय असतात, त्या आधीन राहून काम करायचं असतं, असं एकनाथ खडसे म्हणाले.

ईडीचा उपयोग आपल्या विरोधकांना दाबण्यासाठी – छगन भुजबळ

एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस बजावण्यात आल्याचे वृत्त समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्यावर तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मंत्री छगन भुजबळ म्हणाले, एकनाथ खडसेंना नोटीस मिळणारच होती. ईडीचा उपयोग आपल्या विरोधकांना दाबण्यासाठी होतोय. जो विरोधात बोलेल त्याला त्रास देण्याचा प्रयत्न होतो.असा आरोप त्यांनी केला.

ही एकप्रकारे भाजपची हुकूमशाही – अमोल मिटकरी

खडसे यांना नोटीस बजावण्यामागे भाजपचा हात आहे. ही एकप्रकारे भाजपची हुकूमशाही असून याला खडसे भक्कमपणे तोंड देतील. भाजपच्या ईडीला खडसे सीडी लावून उत्तर देतील, असे राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment