जळगाव । भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ खडसे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना चांगलचं धारेवर धरलं. भाजपमध्ये असतानाची खदखद बोलून दाखवताना त्यांनी फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. काही मिळालं, नाही मिळालं याचं दु:ख नाही, देवेंद्र फडणवीसांनी छळले. मी फक्त फडणवीसांवर नाराज आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले. माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आणि तो देवेंद्र फडणवीसांना गुन्हा दाखल करायला लावला याचा मनस्ताप झाला, असं खडसे म्हणाले.
भाजप सोडताना खंत आहे. मला पक्षातून ढकलून लावलं. महिलेला माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करायला सांगितला, फडणवीसांनी मनस्ताप दिला, असं खडसेंनी सांगितलं. गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, पांडुरंग फुंडकरांसारखे कितीतरी नेते होते, त्यांच्यासोबत आजतागातयत भाजपचं काम केलं. भाजपने मला अनेक मोठी पदं दिली, मी ती नाकारु शकत नाही. मी भाजपवर किंवा केंद्रातील नेत्यावर टीका केली नाही, असं खडसे म्हणाले.
माझ्यासोबत एकही आमदार, एकही खासदार नाही. रक्षाताईंनी भाजप सोडणार नाही असं सांगितलं आहे, त्यांचा निर्णय घेण्यासाठी त्या सक्षम आहेत, असं खडसे म्हणाले. मला राष्ट्रवादीने कोणतंही आश्वासन दिलं नाही. मंत्रिपदाबाबत राष्ट्रवादीच सांगू शकेल. मला पदाची अपेक्षा नाही. माझ्या ताकदीने मी पदं मिळवली आहेत. सहकारातून मिळवलं आहे, असं खडसे म्हणाले.
एकनाथ खडसेंनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले…
वाचा सविस्तर 👉 https://t.co/cn6gUHHjGM@Dev_Fadnavis @EknathKhadseBJP @BJP4Maharashtra @MumbaiNCP #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 21, 2020
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशानंतर एकनाथ खडसेंना मिळेल 'हे' खातं
वाचा सविस्तर -👉 https://t.co/U5dDkyivCa
@EknathKhadseBJP @BJP4Maharashtra @NCPspeaks @PawarSpeaks #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 21, 2020
एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या घोषणेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, म्हणाले..
वाचा सविस्तर -👉 https://t.co/4ndFq9CZOh@CMOMaharashtra @EknathKhadseBJP @BJP4Maharashtra @NCPspeaks #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 21, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”