हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना सौम्य हृदयविकाराचा झटका आला आहे. खडसे यांना तातडीने मुंबईला आणण्यात येणार आहे. त्यासाठी एअर एम्ब्युलन्सची व्यवस्था करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिले आहेत. आज दुपारी एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर तात्काळ त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या साताऱ्यातील दरे गावी आलेत आहेत. ते आपल्या शेतात फेरफटका मारत असतानाच त्यांना एकनाथ खडसे यांच्या प्रकृतीबाबत माहिती समजली. एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत संपर्क साधला. यावेळी तात्कळ शिंदे यांनी एकनाथ खडसे यांच्यासाठी एअर एम्ब्युलन्सची व्यवस्था करण्याबाबत आदेश दिले. त्यांची प्रकृती सध्या ठीक असल्याचे समजतंय.