खडसेंची- अमित शहांसोबत चर्चा: भाजपात घरवापसी करणार??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले जेष्ठ नेते एकनाथ खडसे आता पुन्हा घरवापसी करणार का ? अशा चर्चा रंगल्या आहेत. एकनाथ खडसे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचा दावा काही दिवसांपूर्वीच आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्यांच्या या दाव्याला भाजप खासदार रक्षा खडसे यांनी पुष्टी देत खडसेंची अमित शहा यांच्यासोबत भेट झाली नाही पण त्यांची फोनवरून चर्चा झाली असे सांगितले .

रक्षा खडसे यांनी म्हंटल, अमित शाहांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे शाह आणि खडसे यांच्यात भेट होऊ शकली नाही, पण फोनवरून चर्चा झाली. चर्चा या वेगवेगळ्या असतात . मात्र नाथाभाऊ भाजपमध्ये येणार की नाही याबाबत मला काही माहिती नाही असं त्यांनी म्हंटल. नाथाभाऊ राष्ट्रवादीत आहेत आणि मी भाजपमध्ये आहे असेही सांगायला त्या विसरल्या नाहीत.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर एकनाथ खडसे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. अमित शाह देशाचे गृहमंत्री आहेत. अमित शाह यांना भेटू नये हे नियम आहेत का? अमित शहा यांना मी यापूर्वीही भेटलो आणि आहे इथून पुढेही भेटणार आहे. पण याचा वेगळा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही असे खडसेंनी स्पष्ट केलं.