‘WelCome खडसे साहेब!’ म्हणतं रोहित पवारांनी केलं ‘हे’ सूचक वक्तव्य

मुंबई । भाजपचे माजी नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. खडसेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशावर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहे. एकीकडे भाजपचे नेते सावधपणे प्रतिक्रिया देत असताना महाविकासआघाडीतील सर्व नेत्यांनी एकनाथ खडसेंच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. या सगळ्यात शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिलेली प्रतिक्रिया अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.

रोहित पवार यांनी एकनाथ खडसे यांना वेलकम म्हणत राष्ट्रवादीत त्यांचे स्वागत केलेय. तर दुसरीकडे रोहित पवार यांनी वर्षभरापूर्वी राष्ट्रवादी संपली असे म्हणणाऱ्या विरोधकांना टोलाही लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसला ओहोटी लागली’, अशा बातम्या वर्षभरापूर्वी येत होत्या. पण निसर्गाचाच नियम आहे, ओहोटी संपल्यानंतर भरती सुरु होते, असे रोहित पवार यांनी म्हटले. आता रोहित पवार यांच्या या वक्तव्याचा नक्की काय अर्थ लावायचा, याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

एकनाथ खडसे यांच्यानंतर भाजपमधील नाराज नेतेही राष्ट्रवादीत येणार का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. भाजपमध्ये एकनाथ खडसे यांच्यासोबत पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे हे नेतेही देवेंद्र फडणवीसांवर नाराज होते. त्यामुळे खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे भाजपमधील फडणवीसविरोधी गट बंड करणार का, हे पाहावे लागेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”