फडणवीस यांच्या शपथविधीनंतर खडसे यांची सूचक प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी । देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राज्याच्या सत्तानाट्यात पुन्हा एकदा शिवसेनेची पीछेहाट झाल्याची चर्चा आता होता आहे. याच बाबतीत भाजापचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्राच्या जनतेने शिवसेना-भाजपा युतीला कौल दिला होता. या राज्यात महायुतीचे सरकार यावं अशी इच्छा होती. महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळावं असं जनतेच्या मनात होत. मात्र शिवसेना मुख्यमंत्रीपदाच्या आपल्या भूमिकेवर ठाम राहिली, चर्चेने प्रश्न सुटले असते. शिवसेनेने ही परिस्थिती स्वतःहून ओढावून घेतली आहे. आणि आजच हे चित्र धक्कादायक नव्हतं. मात्र दिल्लीतील वरिष्ठ नेते याबद्दल काही तरी निर्णय घेतील. याबद्दल विश्वास होता, असं मत माजी मंत्री एकनाथ खडसेंनी व्यक्त केल आहे.