Monday, January 30, 2023

भाजपमध्ये होणार राजकीय भूकंप !! 10-12 आमदार माझ्या संपर्कात ; खडसेंचा दावा

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काल भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून उद्याच ते राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार आहेत. खडसेंच्या राजीनाम्या मुळे भाजपात खळबळ उडाली आहे. त्यातच माझ्यासोबत उद्या भाजपचे 15-16 माजी आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार असून भाजपमधील 10-12 आमदार माझ्या संपर्कात आहेत, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे. त्यामुळे आगामी काळात भाजपमध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपमध्ये पूर्वी अस्तित्वात असलेली सामूहिक नेतृत्त्वाची परंपरा संपुष्टात आली आहे. आता पक्षात केवळ एकाधिकारशाहीने निर्णय घेतले जातात, अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली. पूर्वीच्या कालखंडातील आमचे नेते सर्वांशी सल्लामसलत करुन निर्णय व्हायचा. पण अलीकडच्या काळात एकाच व्यक्तीने निर्णय घ्यावा आणि त्याची अंमलबजावणी करावी, असा कारभार सुरु आहे. निर्णय आधीच ठरलेला असतो, फक्त नावापुरते विचारले जाते, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले.

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर पक्षातील अनेक नेते नाराज आहेत. परंतु, हे नेते समोर येऊन बोलत नाहीत. एवढेच काय भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेदेखील देवेंद्र फडणवीस यांना विचारल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत, असा दावा खडसे यांनी केला.

दरम्यान, एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करतील अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं.  एकनाथ खडसेंचे राष्ट्रवादीत आम्ही स्वागत करत आहोत. त्यांचा पक्षप्रवेश रात्रीच्या अंधारात नव्हे तर उजेडात होईल, असं जयंत पाटील म्हणाले होते. शुक्रवारी दुपारी 2 वाजता एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करतील.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’