काही दिवस थांबा, कुणी किती भूखंड घेतलेत सांगतो ; एकनाथ खडसेंचा इशारा

Eknath Khadase
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करताना भाजपला चांगलाच इशारा दिला आहे. काही दिवस थांबा, कुणी किती भूखंड घेतलेत सांगतो, अशा शब्दांत एकनाथ खडसे यांनी इशारा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर बोलताना खडसे यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. जयंतराव, काही दिवस थांबा, कुणी किती भूखंड घेतलेत सांगतो. मी सांगतो कोणी काय केलं? मला कोणालाही जाणीवपूर्वक त्रास द्यायचा नाही. परंतु, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. मी याविरोधात आवाज उठवेन, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले.

आज मला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश मिळाला नसता तर माझ्यावर राजकीय संन्यास घेण्याची वेळ आली असती. आता मला मार्गदर्शन करायला सांगणारे नेते चार दिवसांपूर्वी भाजपमध्ये आले आहेत. तुम्हाला पहाटे पाच वाजता शपथेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस चांगला वाटला होता. तसाच तो मला आज चांगला वाटतो, अशा शब्दांत एकनाथ खडसे यांनी भाजपच्या नेत्यांना प्रत्युत्तर दिले.

 

खडसे पुढे म्हणाले , एकदा जयंतराव मला म्हणाले होते की तुम्ही राष्ट्रवादी मध्ये आलात तर ते तुमच्यामागे ईडी लावतील, असे आमचे गमतीत बोलणं सुरु होतं. पण आता सांगतो जर त्यांनी ईडी लावली, तर मी सीडी लावीन, असा  इशारा एकनाथ खडसे यांनी दिला.

आयुष्याचे ४० वर्ष भाजपमध्ये काम केलं. पण विधानसभेत माझी किती बदनामी झाली, छळ केला गेला हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं. माझं काय चुकलं? या प्रश्नाचं उत्तर मला या क्षणापर्यंत मिळालं नाही.असंही खडसे म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’