माझं टेन्शन संपलं ; आता मीच इतरांना टेन्शन देणार ; खडसेंचा इशारा

Eknath Khadase
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप मधून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे भलतेच आक्रमक झाले असून भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. माझ्या डोक्यावरील टेन्शन कमी झालं आहे. त्यामुळे आता इतरांना टेन्शन देण्याचे काम मी सुरु करणार आहे, असा इशारा राष्ट्रवादी एकनाथ खडसे यांनी दिला. तसेच कधी माझ्या मागे ईडी लागेल, कधी अँटी करप्शन लागेल, याची नेहमी भीती असायची, असेही खडसेंनी यावेळी सांगितले.

मागच्या कालखंडात गेले चार वर्षे मी भीतीच्या छायेखाली वावरत होतो. कधी माझ्या मागे ईडी लागेल, कधी अँटी करप्शन लागेल. कधी विनयभंगासारखी केस दाखल केली जाईल, याची नेहमी भीती असायची. मात्र आता मी त्या केसमधून निर्दोष सुटलो आहे. विनयभंगासारख्या खटल्यातूनही बाहेर आलो आहे.” या सर्वातून बाहेर आल्याने माझ्या डोक्यावरील टेन्शन कमी झालं आहे. आता एनसीपीत आलो. त्यामुळे आता इतरांना टेन्शन देण्याचे काम मी सुरु करणार आहे,” असा इशारा एकनाथ खडसे यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपला दिला.

खडसे पुढे म्हणाले, “भाजपला शेटजी भटजींचा पक्ष म्हटलं जात होतं. मारवाडी भटांचा पक्ष असेही म्हणायचे. तेव्हापासून आम्ही काम करत आहोत. ही ओळख गोपीनाथ मुंडे, मी, नितीनजी, प्रमोदजी, अण्णा डांगे यासारख्या कार्यकर्त्यांनी काम केलं. बहुजन चेहरा करण्याचा प्रयत्न केला. मी 2014 नंतर बहुजन मुख्यमंत्री झाला पाहिजे असं नुसतं म्हटलं होतं. तेव्हापासून माझ्यामागे चौकशीचा ससेमीरा लागला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’