एकनाथ शिंदे 40 आमदारांसह गुवाहाटीत दाखल; राजकीय उलथापालथ होणार??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे हेवीवेट नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत तब्बल 40 आमदारांसोबत सुरत गाठले होते. या संपूर्ण घडामोडी मुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. त्यातच आता आमदारांना अजून सुरक्षित ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे शिवसेनेचे ३३ तसेच अपक्ष 7 आमदारांना सुरतहून गुवाहाटी येथे घेऊन गेले आहेत.

आज मध्यरात्रीच शिवसेना आमदारांना सुरतमधील हॉटेलमधून एअरलिफ्ट करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत एकनाथ शिंदे यांचे बोलणं झालं होतं तरीही शिंदे यांनी आमदारांना गुवाहाटी ला हलवल्या मुळे उद्धव ठाकरेंसोबतची चर्च्या निष्फळ ठरली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ३३ तर अपक्ष सात असे एकूण ४० आमदार आहेत.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासोबत सरकार मधील अनेक मत्रीही सामील झाल्यानं खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे आपला गट स्थापन करून भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात मोठी उलथापालथ होते का हे पाहावे लागेल.