मुंबई : हॅलो महाराष्ट्र – काय झाडी…काय डोंगर..काय हाटील..एकदम ओकेच..असं म्हणणारे शिवसेनेेचे बंडखोर आमदार शहाजी बापू (Shahaji Bapu) पाटील सध्या चांगलेच चर्चेत आहेत. काय झाडी…काय डोंगर..काय हाटील..एकदम ओकेच त्यांच्या या डायलॉगवर तर गाणं सुद्धा आलं आहे. शहाजी पाटलांच्या (Shahaji Bapu) या दमदार कामगिरीचे खुद्द एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले आहे आणि हॉटेलमध्येच त्यांना डायलॉग म्हणायला लावला.
शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे राज्यातले वातावरण ढवळून निघाले आहे. एकीकडे तणावपूर्ण वातावरण आहे, पण अशातच आमदार कशी मजाा करताय हे शिवसेनेचे सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu) यांनी हे पटवून दिलं. शहाजीबापू पाटील यांच्या या वाक्याची भुरळ संपूर्ण महाराष्ट्राला पडलेली आहे. आज सकाळी सगळे आमदार हॉटेलच्या लॉबीत आले असता त्यांनी शहाजी बापूंच (Shahaji Bapu) त्यांनी मनापासून कौतुक केलं. यावेळी शिंदे यांनी पाटील यांना हे त्यांचं सुपरहिट वाक्य पुन्हा एकदा म्हणून दाखवण्याची विनंती केली. यानंतर शहाजी बापूंनीसुद्धा एकनाथ शिंदेंसमोर हे वाक्य पुन्हा एकदा म्हणून दाखवलं. तसंच हे वाक्य किती व्हायरल झालंय आणि त्याची लोकांनी गाणी तयार केली हे देखील दाखवून दिलं.
'काय झाडी…काय डोंगार' फेम आमदार शहाजी बापू पाटील यांचे एकनाथ शिंदेंकडून कौतुक pic.twitter.com/Up1TgYlhLW
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) June 28, 2022
शहाजी बापूंनी बंड का पुकारले ?
शहाजी बापूंच्या (Shahaji Bapu) सांगोला मतदारसंघातील विकास निधी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी जाणीवपूर्वक रोखला आहे. महाविकास आघाडीला आमचा विरोध आहे. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार प्रामाणिकपणे पुढे नेणारे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आपण स्वखुशीने गुवाहाटी येथे आलो आहोत. एकनाथ शिंदे वगळता आपण कोणत्याही नेत्याच्या किंवा पक्ष पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात नाही. याबाबत जे काही गैरसमज पसरवले जात आहेत त्याला जनतेने आणि सर्वसामान्य शिवसैनिकांनी बळी पडू नये ही विनंती, असे शहाजी बापूंनी स्पष्ट केले आहे.
हे पण वाचा :
शिवसैनिकाची थेट बंडखोर आमदाराच्या फेसबुक पेजवरुन खळबळजनक पोस्ट; अकाऊंट हॅक केलं?
हो, फडणवीसांनीच आम्हांला संरक्षण दिले- दीपक केसरकर
Voter ID मधील घराचा पत्ता कसा बदलावा हे समजून घ्या
PM Kisan च्या 11 वा हफ्त्याचे पैसे मिळवण्यासाठी ‘या’ नंबर करा तक्रार !!!
‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांना 1 वर्षात दिला 960 टक्के रिटर्न !!!