एकनाथ शिंदे मुंबईत दाखल; आजच शपथविधी होणार??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर बंडखोर आमदार एकनाथ शिंदे आज मुंबईत दाखल झाले. शिंदेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी भाजपचे अन्य नेतेही उपस्थित होते.

भाजप आणि शिंदे गट आजच सत्तास्थापनेचा दावा करणार आशा चर्चा सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे फडणवीसांच्या सागर बंगल्यावर पोचले असून दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. त्यानंतर दोन्ही नेते एकत्रित राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्याकडे जाणार आहेत.

यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासाठी केंद्र सरकार कडून Z सुरक्षा आणि राज्याकडून मोठी सुरक्षा तैनात होती. तसेच शिंदे यांचे कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात जमा झाले आहेत. आजच संध्याकाळी किंवा उद्या सकाळी फडणवीस आणि शिंदे यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.