एकनाथ शिंदे भावी मुख्यमंत्री !! ठाण्यातील बॅनरमुळे चर्चाना उधाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा ९ फेब्रुवारीला वाढदिवस आहे. त्यानिमित्त मुलुंडसह सर्व ठाण्यात पोस्टर्स, बॅनर्स झळकाविण्यात आले आहेत. या बॅनर्समध्ये एकनाथ शिंदे यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यामुळे दुसऱ्या कोणाकडे तरी मुख्यमंत्री पदाचा कारभार सोपवावा अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यातच आता एकनाथ शिंदे याचा बॅनर भावी मुख्यमंत्री असा केल्याने चर्चांना उधाण आले आहे.

एकनाथ शिंदे हे शिवसेनेतील दिग्गज नेत्यांपैकी एक आहेत. राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरु असताना शिवसेनेकडून एकनाथ शिंदे हेच नाव सगळ्यातआघाडीवर होते. परंतु, ऐनवेळी मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्याचा निर्णय झाला आणि एकनाथ शिंदे या स्पर्धेतून बाहेर पडले. मात्र, ठाण्यातील बॅनर्समुळे पुन्हा एकदा नवी चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे

Leave a Comment