हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आमदारांपाठोपाठ आता शिवसेना खासदारही बंडखोरी च्या तयारीत असून तब्बल 14 खासदार शिंदे गटात सामील होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत विचारलं असता शिवसेनेच्या १९ खासादारांपैकी तब्बल १८ खासदार आपल्यासोबत असल्याचा दावा केलाय त्यांनी केला आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा झटका असेल.
एकनाथ शिंदे सध्या दिल्ली दौऱ्यावर असून यावेळी पत्रकारांशी संवेदनशील साधताना ते म्हणाले, शिवसेनेचे फक्त 14 नव्हे तर 18 खासदार आपलेच आहेत. सर्वजण येणार असून आपण त्यांची भेट घेणार आहोत अस शिंदे म्हणाले. खासदारांसोबत भेट झाल्यानंतर अधिक माहिती देऊ असेही त्यांनी सांगितले. शिंदे यांच्या या दाव्याने शिवसेनेत खासदारांमध्येही उभी फूट पडल्याचे समोर येत आहे.
दरम्यान, शिंदे गटाच्या ऑनलाइन बैठकीत शिवसेनेचे १२ बंडखोर खासदार सहभागी झाल्याचे कळताच सोमवारी संध्याकाळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिल्लीतील निवासस्थानी शिवसेनेच्या खासदारांची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला विनायक राऊत, अरविंद सावंत, संजय जाधव, ओमराजे निंबाळकर, राजन विचारे, अनिल देसाई, आणि प्रियंका चतुर्वेदी येवडेच खासदार उपस्थित होते. त्यामुळे चर्चाना उधाण आले आहे.