हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माझ्या सोबत आलेल्या एकूण 50 आमदारांपैकी एकही आमदार पुढच्या निवडणुकीत पडला तर मी राजकारण सोडेन असं खुलं चॅलेंज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिले आहे. मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या सत्कार सोहळ्यात एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषण करत विरोधकांचा समाचार घेतला
काही लोक बोलतात यांच्यातील 50 पैकी एकही आमदार निवडून येणार नाही. पण मी तुम्हाला सांगतो कि या आमदारांची जबाबदारी मी घेतलेली आहे. आणि यांच्यातील एकही आमदार पडणार नाही. मी तेव्हा पण संगितलं आहे माझ्या सोबत असलेला एक आमदार जरी पडला तरी हा एकनाथ शिंदे राजकारण सोडून निघून जाईन. तुम्ही कोण ठरवणारे?? जनताच सर्व काही ठरवत असते असं शिंदे म्हणाले.
दरम्यान, औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला आपण स्थगिती दिलेली नाही असेही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे . महाविकास आघाडीने घेतलेला निर्णय हा बेकायदेशीर होता. सरकार अल्पमतात असताना केलेला तो निर्णय होता. मात्र, लवकरच कॅबिनेटमधील बैठकीत संभाजीनगर, धाराशीव तसेच दि. बा. पाटील नावांचा प्रस्ताव पुन्हा मंजूर करू, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हंटल .