हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळले असून लवकरच भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन होईल. भाजपकडून शिंदे गटाला राज्यात आणि केंद्रात अनेक मंत्रीपदे देण्याची ऑफर आहे अशाही चर्चा रंगल्या होत्या. मात्र आता खुद्द एकनाथ शिंदे यांनी याबाबत माहिती देत या सर्व चर्चाना पूर्णविराम दिला आहे.
एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका असे एकनाथ शिंदे म्हणाले.
भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 30, 2022
दरम्यान, महाविकास आघाडी सरकार कोसळल्या नंतर भाजप आजच सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. भाजपचे 106, शिंदे गटाचे 51 आणि काही अपक्षांना धरून भाजप राज्यात सत्तास्थापन करेल. शिंदे गटालाही या सत्तेच्या वाट्यात भरपूर मंत्रीपदे आणि अनेक खाती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.