हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपुरातील महत्वाच्या असलेल्या एम्स रुग्णालयात आरोग्य सेवांचे लोकार्पण केले. यावेळी भाषणादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्गाच्या उभारणीत आलेल्या अडचणीबाबत माहिती दिली. त्यांनी समृद्धी महामार्गाच्या कामाला काहींनी सुरुवातीपासूनच विरोध केला. मात्र, आम्ही मागे हटलो नाही. आम्ही महामार्गासाठी जे शेतकरी जमीन देणार होते त्यांना विश्वासात घेतले आणि त्यांना पटवून सांगितले. शेतकऱ्यांनीही आमच्यावर विश्वास दाखवला. पण आमच्या या कामाला काहींचा विरोध होताच, असे नाव न घेता मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नागपूर येथील एम्स रुग्णालयात आरोग्य सेवांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फेटा घालून स्वागत करण्यात आले. यावेळी केंद्रीयमंत्री भरती पवार, मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.
LIVE | नागपूरच्या शिरपेचात मानाचा तूरा रोवणार्या विविध विकास प्रकल्पांचे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते उदघाटन | नागपूर@narendramodi#MahaSamruddhi #Nagpur #NarendraModi #Maharashtra #modiinnagpur https://t.co/QuiMlrIBtb
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 11, 2022
यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्राची भाग्यरेषा बदलणारा समृद्धी महामार्ग आहे. समृद्धी महामार्गाच्या उभारणीवेळी अनेक अडचणी आल्या. याला काही लोकांचा विरोध झाला. मी मंत्री असताना या महामार्गाचे काम पूर्ण केले आणि आता मी मुख्यमंत्री असताना या महामार्गाला हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले याचा मला खूप आनंद होत आहे. आम्ही या महामार्गाला विशेष प्रकल्पाचा दर्जा दिला आहे. हा समृद्धी महामार्ग महाराष्ट्राची भाग्य बदलणारा आहे. आम्ही महामार्गाच्या बजावला 35 हजार वृक्ष लावणार आहोत, असे शिंदे यांनी म्हंटले.