आम्ही समृद्धी महामार्गाचं उद्घाटन करणार होतो पण.., अजित पवारांनी व्यक्त केली खंत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट्र – राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी समृद्धी महामार्ग उद्घाटनावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले कि, ‘समृद्धी महामार्ग काही माझा नाही. पण मला उद्घाटनाचं आमंत्रण आलं आहे. या रस्त्यामुळे अनेक गाव जोडणार आहे. वेळ कमी होणार आहे. आमच्या सरकार काळातही समृद्धी महामार्गाला मदत दिली. आम्ही उद्घाटन करणार होतो पण एका पुलाचं काम राहील त्यामुळे नाही करता आलं असे म्हणत त्यांनी (Ajit Pawar) खंत व्यक्त केली.

फडणवीसांना लगावला टोला
समृद्धी महामार्ग वर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पाहणी केली. उपमुख्यमंत्री गाडी चालवली,ती गाडी कोणाची होती? मुख्यमंत्र्यांच्या गाडीच स्पीड पाहिला का, एका महामार्गावर एक स्पीड दुसऱ्या महामार्गावर वेगळा स्पीड असं कोण ठरवतं माहिती नाही. या स्पीड वरून कोणी कोर्टात जाऊ नये म्हणजे झालं, असा टोला अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावेळी लगावला.

या मार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आलं आहे. काही अडचणी आहेत पण होईल सगळं काम, मोठा रस्ता होतो आहे असेदेखील अजित पवार (Ajit Pawar) यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी अनेक गोष्टींवर भाष्य करताना त्यांनी बोलताना तारतम्य बाळगला पाहिजे, असा सल्ला चंद्रकांत पाटलांना दिला आहे.

हे पण वाचा :
Jio Fiber च्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 14 OTT Apps चे फायदे
Smartphones मधील मागचा कॅमेरा नेहमी डाव्या बाजूलाच का असतो???
PNB च्या खातेधारकांनी लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम
RBL Bank च्या ‘या’ क्रेडिट कार्डवरील प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर मिळवा 1% कॅशबॅक
मुलांसाठी बचत खाते उघडण्याचे फायदे जाणून घ्या