हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूरच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जोरात भाषण केले. यावेळी त्यांनी विरोधकांच्या टीकेचा समाचार तर घेतलाच शिवाय महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीने केलेल्या कामाची व माहिती दिली. राज्यातील शेतकऱ्यांसाठी अनेक हिताचे निर्णय घेतले असून आता मुख्यमंत्रीच नाहि तर शेतकरीही हेलिकॉप्टरने फिरू शकेल, असे शिंदे यांनी म्हंटले.
आज अधिवेशनात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर शेतकऱ्यांच्या व जनतेच्या हिताच्या दृष्टीने केलेल्या कामाची माहिती दिली. यावेळी त्यांनी प्रथम दिव्यांगांच्या हिताच्या दृष्टीने घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. आम्ही राज्यात दिव्यांगांसाठी मंत्रालय सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दिव्यांगांसाठी मंत्रालय करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य बनले आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
#LIVE : विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे https://t.co/EUskcFuVWr
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 30, 2022
पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर
मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही राज्यातील सात कोटी लोकांना रेशनचा दिवाळीचा शिधा वाटप केला. चार वस्तू १०० रुपयांत दिल्या. चीनमध्ये कोविड आले असून अशा परिस्थितीत धानासाठी हेक्टरी १५ हजार रुपयांचा बोनस जाहीर केला. याचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जाणार आहेत. त्यामुळे कोणालाही पैसे खायला मिळणार नाही.अतिवृष्टीग्रस्तांना पाच हजार कोटींची मदत केली.
वैद्यकीय सुविधा
लोकांना अत्याधुनिक अशा पद्धती वैद्यकीय सुविधा मिळाव्यात म्हणून राज्यात ७०० बाळासाहेब ठाकरे रुग्णालये सुरू केली जाणार आहेत. मुंबईत ५२ दवाखाने सुरू केले आहेत. ठाण्याला त्याची सुरुवात केली. त्यातून सर्वसामान्यांना मोफत औषध, मोफत ट्रीटमेंट मिळणार आहे. १४७ प्रकारच्या मोफत तपासण्या केल्या जाणार आहेत. त्यातून योग्य उपचार लोकांना घेता येतील.
जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू
शेतकऱ्यांची सर्वात मोठी समस्या हि पिकांना पाणी देण्याची असते. त्यांना पाणी मिळावे म्हणून आमच्या सरकारने जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू केली. शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. त्यामुळे महाराष्ट्र सुजलाम सुफल्म होण्यास नक्कीच मदत होईल, शेतकऱ्याला जे पाहिजे ते देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. विदर्भातील शेतकरीही चांगल्या गाडीत गेला पाहिजे. शेतकऱ्यानंसुद्धा हेलिकॅप्टरनं फिरलं पाहिजे. तालुकानुसार हेलिपॅड करायचंय. अचानक आरोग्य, अपघात झाल्यास एअर अम्बुलन्सनं आणता येऊ शकतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटले.