मंत्रालयामध्येच बोगस मुलाखतीचा अड्डा; अजित पवारांचा मोठा खुलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. यावेळी अजित पवार (ajit pawar) यांनी एक मोठा खुलासा केला आहे. मंत्रालयामध्ये बोगस मुलाखतीचा अड्डा सुरू असल्याचा खुलासा अजित पवारांनी (ajit pawar) यावेळी केला. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत.

काय म्हणाले अजित पवार?
हिवाळी अधिवेशनच्या शेवटच्या दिवशी अजित पवार (ajit pawar) यांनी आक्रमक भूमिका पार पाडली. यावेळी मंत्रालयच बोगस मुलाखातीचा अड्डा बनला आहे. शिपाई लिपिकांचा भरती घोटाळा, बोगस मुलाखाती सामान्य प्रशासनाच्या उपसचिव कार्यालयात घेण्यात आल्याची माहिती अजित पवारांनी सभागृहामध्ये दिली. यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

त्याआधी लक्ष्यवेधीवरून अजित पवार चांगलेच संतापले होते. 5 नंबरची लक्ष्यवेधी पुढे ढकलून 6 नंबरची पुकारण्यात आली आहे. भाजपचे नेते गिरीश महाजन हे सभागृहात गैरहजर असल्यामुळे ही लक्ष्यवेधी पुढे ढकलण्यात आली होती. पाच नंबरची लक्ष्यवेधी पुढे का ढकलली, मंत्र्याला इथं राहणे गरजेचं होतं. आम्ही सुद्धा मंत्री होतो, आम्ही काय इथे एकदम येऊन बसलो नाहीये. मंत्र्याचं काम असतं, आमचं चुकलं तर आम्हाला समज द्या, त्यांचं चुकलं तर त्यावर पांघरून घालू नका, त्यालाही समज द्या. पुढच्या अधिवेशनात कोण राहणार कोण नाही, काय माहिती, सगळ्यांचे लाड सुरू आहे, अशा शब्दांमध्ये अजित पवार (ajit pawar) यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.

हे पण वाचा :
‘कांतारा’ फेम अभिनेता चेतन अहिंसावर ‘या’ प्रकरणी गुन्हा दाखल
अचानक कारच्या चाकाखाली आली बाईक, 10 फूट अंतरापर्यंत फरफटत गेला तरुण
KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांचा अपघात; पायाची नस कापली
IRCTC च्या वेबसाईटद्वारे अशा प्रकारे बुक करा तिकिटे
Indian Army मध्ये नोकरीची संधी; काय आहे पात्रता?