सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा जिल्ह्यातील 259 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या मतमोजणीस सुरुवात झाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महाबळेश्वर तालुक्यातील ग्रापपंचायत निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला आहे. तालुक्यातील लाखवड ग्रामपंचायतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या उमेदवार रूपाली संकपाळ सरपंचपदी विजयी झाल्या आहेत.
महाबळेश्वर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाच्या उमेदवारांनी वजी मिळवला आहे. या तालुक्यातील लाखवड ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदासाठी शिंदे गटातून रूपाली संकपाळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या निवडणुकीत त्याचा चांगल्या मतांनी विजय झाला. तर विरोधी गटातील उमेदवाराला पराभवाला सामोरे जावे लागले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तालुक्यात तीन ग्रामपंचायतीमधील एक ग्रामपंचायतीवर मुख्यमंत्र्या गटाला सरपंच पद हासील करण्यात यश आले आहे. तर शिंदे गटाने क्षेत्र माहुलीत झेंडा फडकावला असून या ठिकाणी आमदार महेश शिंदेच्या विचाराचा सरपंच १६६ मतांनी विजयी झाला आहे.