हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे अनेक सणांवर निर्बंध लादण्यात आले होते. मात्र, यंदा दहीहंडी आणि अनंत चतुर्दशी या सणाला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दंहीहंडीबाबत आणखी एक ऐतिहासिक निर्णय घेतला असून दहीहंडीचा समावेश खेळामध्ये करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्या 18 ऑगस्ट रोजी विधानभवनात दहींहंडीला खेळाचा दर्जा देण्याबाबतच्या निर्णयाची घोषणा करणार असल्याची माहिती क्रिडा मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.
राज्याच्या क्रिडा विभागाची महत्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, क्रिडा मंत्री गिरीष महाजन यांची उपस्थिती होती. या बैठकीनंतर मंत्री महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, बैठकीवेळी दहीहंडीचा समावेश खेळामध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता प्रो कब्बडी प्रेमाणे प्रो दहीहंडी सुरू केली जाणार आहे. उद्या 18 ऑगस्ट रोजी या संबंधीत जीआर काढला जाणार असून मुख्यमंत्री शिंदे याबाबतची घोषणा करणार आहेत.
दहीहंडी आता 365 दिवस खेळली जाणार
राज्य सरकारच्यावतीने दहीहंडीचा समावेश क्रीडा प्रकारात करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आल्याने आता दररोज दहीहंडीचे थर रचले जाणार आहेत. या घोषणेनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्याच्या अधिवेशनात याबाबतची माहिती देणार असून त्याचा जीआरही काढला जाणार आहे. त्यामुळे क्रीडा प्रकारात आता दहिहंडीचाही नव्याने समावेश केला जाणार असल्याने दहीहंडी शौकिनांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.