सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणारही नाही; शिवसेनेशी बंडानंतर एकनाथ शिंदेंचे ट्विट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे दुसऱ्या क्रमांकाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला झटका देत भाजपशी सत्ता स्थापन करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री ठाकरेंकडे पाठवला आहे. दरम्यान शिवसेनेकडून शिंदे यांच्यावर कारवाई करण्यात आली असून त्यांना गटनेते पदावरून हटवण्यात आले आहे. त्यानंतर शिंदे याणी नुकतेच एक ट्विट करण्यात आले असून बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही, असे शिंदे यांनी म्हंटले आहे.

शिवसेनेच्या करावीनंतर शिंदे यांनी ट्विट केले असून त्यांनी मी म्हंटले आहे कि, “आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही,” असे शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे.

 

एकनाथ शिंदे यांच्या सोबत शहाजी बापू पाटील, महेश शिंदे सातारा, भरत गोगावले, महेंद्र दळवी, महेश थोरवे, विश्वनाथ भोईर, संजय राठोड, संदीपान भुमरे, उदयसिंह राजपूत, संजय शिरसाठ, रमेश बोरणारे, प्रदीप जैस्वाल, अब्दुल सत्तार आदी आमदार आहेत. दरम्यान शिंदे यांच्याकडून आज दुपारी पत्रकार परिषद घेतली जाणार आहे.

Leave a Comment