मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी मोदींची भेट घेणार; मुख्यमंत्री शिंदेंची सभागृहात माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. मराठी भाषा गौरव दिनी सुरू झालेल्या या अधिवेशनात पहिल्या दिवशी सुरुवातीलाच मराठी भाषेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी मोदींची भेट घेणार असल्याचे सांगत राज्य सरकारची आपली भूमिका मांडली.

राज्यपाल नवनिर्वाचित महामहिम राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरुवात झाली. त्यांच्या अभिभाषणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य छगन भुजबळ यांनी मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भातचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. भुजबळांच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूमिका मांडली.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ‘सभागृहातील सर्व सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह राज्यातील एक शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली जाईल. तसेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत कार्यवाही लवकरात लवकर करावी, अशी विनंती करण्यात येईल.