हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करत भाजपसोबत सत्तास्थापन केलं. यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मे महिन्यातच उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती मात्र तेव्हा ते काहीच बोलले नाहीत असा गौप्यस्फोट केला होता. त्याचविषयी आता खुद्द एकनाथ शिंदे यांना विचारले असता त्यांनी यावर योग्य वेळी बोलू अस म्हंटल आहे. एकनाथ शिंदे यांनी एका एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी नंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. एकनाथ शिंदे यांना मे महिन्यात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती असा मोठा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे यांनी शिवसेना मेळाव्यात केला होता. त्याबाबत विचारला असता शिंदे म्हणाले मला याबाबत काहीच बोलायचं नाही
तसेच उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला याची खंत आम्हांला पण आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर आम्ही काय जल्लोष केला नाही. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी माझं अभिनंदन केले त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो. मी पदासाठी आणि स्वार्थासाठी ही भूमिका घेतलेली नाही असेही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.