हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि शिंदे गटातील दसरा मेळाव्यावरून चर्चा सुरु आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा बीकेसी येथे होणार आहे. तत्पूर्वी आज एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याचा टिझर प्रदर्शित केला आहे. यामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज ऐकू येत आहे तर शिंदे यांनी स्वतः एकलव्य म्हणाल्याचे दिसत आहे.
काय आहे शिंदेंच्या दसरा मेळाव्याचा टीजर –
शिंदे यांनी शेअर केलेल्या टीजर मध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज ऐकू येत आहे. शिवरायांचा भगवा झेंडा, शिवसेनेचा भगवा झेंडा, हिंदू धर्माचा भगवा झेंडा सतत आस्मानात फडकत राहिला पाहिजे… जय हिंद जय महाराष्ट्र असं बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजात ऐकू येत आहे. तसेच एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक लव्य, अशी ओळ त्यानंतर झळकलेली दिसते. व्हिडिओ च्या वरच्या बाजूलाच गर्व से कहो हम हिंदू हैं” हे वाक्यही दिसत आहे.
#दसरा_मेळावा_२०२२ pic.twitter.com/mCQZs6rufq
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 29, 2022
दरम्यान, दसरा मेळाव्यासाठी शिंदे गट आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही जोरदार तयारी केली आहे. दसरा मेळाव्यासाठी जास्तीत जास्त गर्दी जमा करण्याचे प्रयत्न दोन्ही बाजूनी सुरु आहेत. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी दोन्ही गट उत्सुक होते मात्र मुंबई हायकोर्टाने उद्धव ठाकरेंना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी दिली. त्यामुळे शिंदे गट बीकेसी येथील मैदानात मेळावा घेणार आहे.