पंतप्रधान मोदी-शाहांनी मुख्यमंत्री का केलं?; मुख्यमंत्री शिंदेंनी स्वतःच केला खुलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेसोबत बंडखोरी करत भाजपाशी हातमिळवणी करत चार महिन्यापूर्वी राज्यात एकनाथ शिंदे यांनी सत्ता स्थापन केली. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याची घोषणा केली. मात्र, यामागचे खरे कारण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील नगरपालिकेतील कार्यक्रमप्रसंगी सांगितले. “हा एक जोरदार, धाडसी माणूस दिसतोय, असे माझ्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना वाटले. त्यामुळे त्यांनी मला मुख्यमंत्रीपदाची संधी दिली,”असा खुलासा स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे महापालिकेच्यावतीने ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या संकल्पनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते म्हणाले की, भाजपसोबत राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर सर्वांना प्रश्न पडला कि सुरूवातीला मुख्यमंत्री कोण होईल? परंतु मी मोदींना आणि अमित शाह यांना एक जोरदार तसेच धाडसी माणूस वाटलो त्यामुळे त्यांनी मला मुख्यमंत्रीपदाची संधी दिली.

यावेळी शिंदे यांनी एक सूचक असे विधानही केले. “मी जगाच्या पाठीवर कुठेही गेलो. तरी ठाण्यात घरी आल्यानंतर मला शांत झोप लागते. ठाण्यात सुशोभिकरणाची कामे हाती घेण्यात आली असल्याचे शिंदेंनी सांगितले.