हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी तब्बल 40 समर्थक आमदारांसह बंड पुकारत भाजपसोबत जाण्याची मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी ऑनलाइन संवाद साधत सर्व बंडखोरांना स्वगृही परतण्याची विनंती केली. तरीही शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांची ऑफर नाकारली आहे. एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
गेल्या अडीच वर्षात म.वि.आ. सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला,आणि शिवसैनिक भरडला गेला. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे – शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे. अस एकनाथ शिंदे म्हणाले.
३. पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक.
४. महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे.#HindutvaForever
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 22, 2022
पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक. महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे अस ट्विट करत एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच यावेळी त्यांनी #HindutvaForever असा हॅशटॅग वापरुन हिंदुत्त्वाचा नारा दिला.