शिंदेंचा ठाकरेंना दणका! राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी नव्याने पाठवणार
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ठाकरे सरकारच्या काळातील विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी रद्द करण्यात अशा मागणीचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांकडे पाठवल्याची बातमी समोर येत आहे. तसेच शिंदे नव्याने 12 सदस्यांची यादी राज्यपालांना पाठवणार आहेत. विशेष म्हणजे ठाकरे सरकारने 2020 लाच पाठवलेली यादीवर राज्यपालांनी अद्यापही मंजुरी दिली नाही.
राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्यांच्या जुन्या नावांची यादी रद्द समजावी असे पत्र एकनाथ शिंदे यांनी राजभवनला पाठवले आहे. शिंदे- भाजप सरकार आता नवी यादी राज्यपालांना देणार आहे. शिंदे-फडणवीसांकडे 12 नावांसाठी इच्छुकांची संख्या जास्त आहे. या 12 नावांसाठी अनेक नेत्यांनी लॅाबिंग देखील सुरु केली आहे. त्यामुळे आता या यादीत कोणाचा समावेश होणार याचीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उद्धव सेना; माजी मंत्र्यांची सडकून टीका
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/1m5iyjJe2j
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) September 3, 2022
दरम्यान, राज्यातील तत्कालीन ठाकरे सरकारने 12 नोव्हेंबर 2020 मध्ये १२ सदस्यांची यादी राज्यपालांकडे दिली होती. मात्र राज्यपालांनी त्यावर कोणताही निर्णय घेतला नव्हता. या यादीमध्ये एकनाथ खडसे, राजू शेट्टी, रजनी पाटील, सचिन सावंत, मुझफ्फर हुसैन आणि अनिरुद्ध वनकर, यशपाल भिंगे, आनंद शिंदे , उर्मिला मातोंडकर, नितीन बानगुडे पाटील, चंद्रकांत रघुवंशी आणि विजय करंजकर यांचा समावेश होता. या 12 जणांचा पत्ता आता कट होण्याची शक्यता आहे.