हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे आपल्या ५० आमदारांसह गुवाहाटीमध्ये ठाण मांडून बसले आहेत. तर दुरीकडे महाराष्ट्रात उद्या बहुमत सिद्ध करण्याचे आदेश राज्यपालांनी महाविकास आघाडीला दिले आहेत. त्यामुळे उद्याच बहुमत चाचणी घेतली जाणारा आहे. त्यानंतर आता शिंदे गट मतदानासाठी मुंबईत येणार असल्याची माहिती खुद्द शिंदे यांनी दिली असून उद्या बहुमत चाचणी पार पडल्यानंतर जो काही निर्णय येईल त्यानंतर आम्हीही निर्णय घेऊ, असे शिंदे यांनी मोठे विधान केले आहे.
एकनाथ शिंदे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यात बहुमताच्या चाचणीवरून सुरु असलेल्या घडामोडीबाबत प्रतिक्रिया दिली. राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. आम्हीही उद्याच सर्व आमदारांसोबत मुंबईला येणार आहोत. जी काही प्रक्रिया असेल, त्यात आम्ही सहभागी होऊ. आमच्याकडे ५० आमदार आहेत. बहुमत चाचणीनंतर पुढचा निर्णय घेऊ, असे शिंदे यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारल्याने महाविकास आघाडीला सुरुंग लावल्यासारखे झाले आहे. सूरतमध्ये आपल्या आमदारांसह एकनाथ शिंदेंनी भाजप नेत्यांशी भेटीगाठी घेतल्या आहेत. त्यानंतर शिवसेनेकडून मन वळवण्याचा प्रयत्न सुरु झाला. पण एकनाथ शिंदेंनी आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे स्पष्ट केले.




