हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताची कंटेंट क्वीन आणि टेलिव्हिजन प्रॉडक्शन पॉवरहाऊस ‘बालाजी टेलिफिल्म्स’ची सह-संस्थापक एकता कपूरला (Ekta Kapoor)2023 चा इंटरनॅशनल एमी डायरेक्टरेट (Emmy Award) अवॉर्ड मिळणार असल्याची घोषणा ‘इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ टेलिव्हिजन आर्ट्स अँड सायन्स’ चे अध्यक्ष आणि सीईओ ब्रूस एल पासनर यांनी 29 ऑगस्ट रोजी केली. हा पुरस्कार एकता कपूरला 20 नोव्हेंबर 2023 रोजी न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या 51 व्या आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड्स गालामध्ये देण्यात येणार आहे.
का देण्यात आला एकता हा पुरस्कार
एकता कपूरमुळे संपूर्ण oOTT tt प्लॅटफॉर्मला यशाची धुरा मिळाली आणि त्याचे सर्व श्रेय एकताला देण्यात आले आहे. तिने चालवलेल्या मालिका ह्या चांगल्याच जोर धरतात. तसेच, भारताच्या दूरचित्रवाणीला आकार देण्याचे, टेलिव्हिजन वरील आशय आणखी वेगळ्या पद्धतीने सादर करण्याचे आणि भारताच्या सॅटेलाइट टेलिव्हिजन बूमला सुरुवात करण्याचे श्रेय तिला दिले जाते. बालाजी बॅनर अंतर्गत, तिने 17000 तासांहून अधिक टेलिव्हिजन आणि 45 चित्रपटांची निर्मिती केली आहे. तसेच देशातील पहिल्या भारतीय OTT प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या ALTBalaji ला लाँच केले आहे.
काय आहे हा एमी अवॉर्ड
एमी पुरस्कार हा अमेरिकेमधील एक दूरचित्रवाणी पुरस्कार आहे. ह्या पुरस्काराची तुलना ऑस्कर पुरस्कार (चित्रपटसृष्टी) व ग्रॅमी पुरस्कारांसोबत (संगीतसृष्टी) सोबत केली जाते. ह्या पुरस्काराचे वितरण 1949 सालापासून दरवर्षी केले जात आहे. एमी अवॉर्ड्स टेलिव्हिजन आणि उदयोन्मुख मीडियाच्या विविध क्षेत्रातील उत्कृष्टतेला मान्यता देतात. एमी पुरस्कार तीन भगिनी संस्थांद्वारे प्रशासित केले जातात, जे दूरदर्शन आणि ब्रॉडबँड प्रोग्रामिंगच्या विविध क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतात.
हा पुरस्कार प्रदान केल्यानंतर काय होते
जेव्हा एखादी व्यक्ती एम्मी जिंकते, तेव्हा संस्थेच्या अधिकृत एमी नियमांनुसार पुतळा टेलिव्हिजन अकादमीची मालमत्ता राहते. त्यांना ते वारस किंवा उत्तराधिकारी यांच्याकडे देण्याची परवानगी आहे, परंतु पुरस्काराची विक्री, लिलाव किंवा इतर कोणत्याही प्रकारे विल्हेवाट लावली जाऊ शकत नाही.