Wednesday, March 29, 2023

शिंदे गटाला मिळाले ‘हे’ चिन्ह; निवडणूक आयोगाचा निर्णय

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला मशाल हे चिन्ह दिल्यांनतर आता शिंदे गाठला ढाल तलवार हे चिन्ह देण्यात आले आहे . नव्या चिन्हासाठी शिंदे गटाने यापूर्वी दिलेले पर्याय निवडणूक आयोगाने नाकारत त्यांना नवीन चिन्हे पाठवण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर शिंदे गटाने सादर केलेल्या चिन्हांपैकी निवडणूक आयोगाने ढाल तलवार हे चिन्ह त्यांना दिले आहे.

शिंदे गटाने यापूर्वी उगवता सूर्य, त्रिशूळ आणि गदा हि ३ चिन्हे दिले होती. मात्र यातील गदा आणि त्रिशूल हि धार्मिक चिन्हे असल्याचे कारण देत निवडणूक आयोगाने हि चिन्हे नाकारली होती. त्यांनतर आज सकाळपर्यँत नवीन चिन्हांचा पर्याय देण्याचे निर्देश आयोगाने शिंदे गटाला दिले होते. त्यानुसार शिंदे गटाने आज सकाळी निवडणूक आयोगाला तळपता सुर्य, ढाल तलवार, पिंपळाचं झाड ही चिन्ह दिली होती. त्यातील ढाल तलवार हे चिन्ह शिंदे गटाला मिळाले आहे.

- Advertisement -

दरम्यान , नावाबाबत बोलायचं झाल्यास, शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळाल आहे तर उद्धव ठाकरेंच्या गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात आलं आहे. तसेच मशाल हे चिन्ह उद्धव ठाकरेंना मिळालं आहे.

Janhavi Kapoor : साडीतही दिसते तेवढीच हॉट Matheran Toy Train : पर्यटकांसाठी गुड न्यूज! माथेरान मिनी ट्रेन पुन्हा सुरु एकनाथ शिंदेंना नवं चिन्ह लाभकारी? Shriya Saran : अभिनेत्रीनं वाढवलं इंटरनेटवरचं तापमान; ब्रा वरचे फोटो पहा OnePlus Nord Watch : स्वस्त किमतीचं स्मार्ट वॉच लॉंच; जाणून घ्या फिचर्स अन किंमत..