जिल्ह्यात थेट सरपंच पदासह ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | माहे जानेवारी 2021 ते माहे मे 2022 व माहे जून 2022 ते माहे सप्टेंबर 2022 या कालवधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित सातारा जिल्ह्यातील एकूण 9 ग्रापंचायतींच्या (सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या) सार्वत्रिक निवडणुकांकरीता संगणकप्रणालीद्वारे राबविण्यात यावयाचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) प्रशांत आवटे यांनी दिली आहे. सातारा तालुक्यातील खेड, संभाजीनगर, चिंचणेर निं, गोजेगाव, खिंडवाडी, पळसावडे, उफळी व वेणेखोल आणि वाई तालुक्यातील एकमेव बालेघर अशा 9 ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.

संगणकप्रणालीद्वारे राबविण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे ः- नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी) दि. 24 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2022 वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत (दिनांक 27 ऑगस्ट 2022 चा शनिवार 28 ऑगस्ट 2022 चा रविवार व 31 ऑगस्ट 2022 ची सार्वजनिक सुट्टी वगळून). नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी) शुक्रवार दि. 2 सप्टेंबर 2022 सकाळी 11 वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत.

नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी) मंगळवार दि. 6 सप्टेंबर 2022 दुपारी 3 वाजेपर्यंत.निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक व वेळ मंगळवार दि. 6 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजल्यानंतर. आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक रविवार दि. 18 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायं.5.30 वाजेपर्यंत. मतमोजणी व निकाल घोषित करण्याचा दिनांक (मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील त्यानुसार राहील) सोमवार दि. 19 सप्टेंबर 2022. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा अंतिम दिनांक गुरुवार दि. 22 सप्टेंबर 2022 पर्यंत.