हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षात रोज भांडणे होत असून राज्यात कधीही निवडणूक लागू शकते. तसेच महाविकास आघाडीतील दोन पक्षांचे आपल्याला संकेत आहेत अस विधान भाजप आमदार आशिष शेलार यांनी केले आहे. शेलारांच्या विधानाने राज्यात पुन्हा एकदा राजकीय तर्क वितर्काना उधाण आले आहे.
यावेळी त्यांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. हे तीन पक्षाचं सरकार घोटाळेबाज, झोलबाज आणि दगाबाज आहे. काँग्रेस भुरटी आहे. जे मिळेल ते घेतात, ते झोलबाज आहेत. शिवसेना दगाबाज आहे. मोदी आणि फडणवीसांच्या नावानं मतं मागितली आणि दगाबाजी केली. दगाबाजीने का असेना मुख्यमंत्री झाले. असा टोला शेलार यांनी लगावला.
दरम्यान, सध्या राज्य दलाल चालवत आहेत. अनेक खाती दलालांकडून चालवली जात आहेत. गेल्या सात दिवसांपासून आपण पाहतोय की आयकर विभाग काय करतंय. त्यामुळे माझ्या नादाला लागू नका, असा इशारा आशिष शेलार यांनी दिला.