सातारा | सातारा जिल्ह्यातील लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा व दहिवडी या सहा नगरपंचायतींचा निवडणुकीचा बिगुल वाजला असून दि. 1 डिसेंबर ते दि. 22 डिसेंबर यादरम्यान निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
जिल्ह्यातील या सहा नगरपंचायतींसाठी 29 नोव्हेंबर 2021 रोजी अंतिम मतदार याद्या प्रभाग निहाय प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. दि. 1 डिसेंबर ते दि. 7 डिसेंबर दुपारी दोन वाजेपर्यंत वेबसाईटवर अर्ज भरण्यासाठी चा कालावधी आहे. दि.1 डिसेंबर ते दि. 7 डिसेंबर या दरम्यानच अर्ज इच्छुकांचे स्वीकारले जातील. दिनांक दि. 4 डिसेंबर आणि दि. 5 डिसेंबर या दोन दिवशी सुट्टीचा कालावधी असल्याने या दिवशी अर्ज स्विकारले जाणार नाहीत. दि. 8 डिसेंबर रोजी सकाळी दि. 11 वाजल्यापासून अर्जाची छाननी करण्यात येणार असून वैद्य अर्जाच्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध याच दिवशी केली जाईल.
अर्ज माघारी घेण्याचा दिवस दि.13 डिसेंबर सोमवार असून दुपारी तीन वाजेपर्यंत कालावधी राहणार आहे. दि. 21 डिसेंबर मंगळवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या कालावधीत मतदान असणार आहे तर दि. 22 डिसेंबर बुधवारी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
लोणंद नगरपंचायत चा कार्यकाल 3 मे 2021 रोजी संपलेला आहे. तर उर्वरित कोरेगाव पाटण वडूज खंडाळा व दहिवडी या पाच नगरपंचायतींचा कालावधी 18 डिसेंबर 2021 रोजी संपत आहे.