Electric Bike : 307 किमी मायलेज देणारी Electric Bike लॉन्च; पहा किंमत

Electric Bike
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल आणि डिझेलच्या (Electric Bike) वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर अनेक ग्राहकांचा कल हा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळला आहे. त्याच पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी अल्ट्राव्हायोलेटने गुरुवारी आपली इलेक्ट्रिक बाईक F77 भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. आकर्षक लूक आणि दमदार इलेक्ट्रिक मोटरने सुसज्ज असलेली ही स्पोर्ट बाईक तीन पर्यायांमध्ये (एअरस्ट्राइक, लेझर आणि शॅडो) आणि दोन व्हेरियंट (रीकॉन, ओरिजनल) मध्ये लॉन्च करण्यात आली आहे.

307 किमी मायलेज-

अल्ट्राव्हायोलेट F77 इलेक्ट्रिक (Electric Bike) बाईकला 10.3kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक मिळतो जो 38.9 bhp आणि 95 Nm टॉर्क जनरेट करतो. कंपनीचा दावा आहे की ही इलेक्ट्रिक बाईक तब्बल 307 किमी पर्यंत मायलेज देते. या स्पोर्ट बाईकचे टॉप स्पीड १५० किमी प्रतितास असून फक्त 8 सेकंदात ही गाडी 0 ते 100 किमी प्रतितास वेग वाढवू शकतो. देशातील ही सर्वात फास्ट इलेक्ट्रिक बाईक आहे.

Electric Bike

फीचर्स- (Electric Bike)

कंपनीने या बाइकला फ्युचरिस्टिक डिझाइन (Electric Bike) दिले आहे. बाइकमध्ये मोनोशॉक आणि इनव्हर्टेड फोर्क सेटअप, दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक आहेत. एलईडी हेडलाइट्स, टेललॅम्प्स आणि डे टाईम रनिंग लाइट्स (DRL’s) बाईकच्या सौंदर्यात भर घालतात. या इलेक्ट्रिक स्पोर्ट बाईकला स्मार्ट टीएफटी डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यामध्ये बाइकचा वेग, बॅटरीची स्थिती यासंबंधी माहिती उपलब्ध आहे.

Electric Bike

किंमत-

अल्ट्राव्हायोलेटने F77 Airstrike, Shadow आणि Laser या तीन व्हेरिएन्ट मध्ये लॉन्च केली आहे. यामध्ये ग्लाइड, कॉम्बॅट (Electric Bike) आणि बॅलिस्टिक असे तीन रायडिंग मोड आहेत. गाडीच्या किमतीबाबत बोलायचं झाल्यास या इलेक्ट्रिक स्पोर्ट बाईकची एक्स शोरूम किंमत 3.8 लाख रुपये आहे. कंपनीने या बाईकचे बुकिंग आधीच सुरू केले असून ग्राहक 10,000 रुपयांमध्ये Ultraviolette F77 बुक करू शकतात.

हे पण वाचा :

Electric Bike : देशातील पहिली Gear वाली Electric Bike सादर; किती आहे मायलेज?

Ola Electric Bike : E- Scooter नंतर OLA आणणार इलेक्ट्रिक Bike; कधी होणार लॉन्च?

Royal Enfield ची क्रूजर बाइक लॉन्च; जाणून घ्या काय आहे खास

Jawa 42 Bobber : दमदार लूक आणि फीचर्ससह लॉन्च झाली Jawa 42 Bobber; पहा किंमत