नाद खुळा!! आता सूर्याच्या प्रकाशावर धावणार Electric Car; कसं ते पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अमेरिकेची सुप्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक कार कंपनी टेस्ला (Tesla) भारतासोबत एक खास प्रयोग करण्याच्या तयारीत आहे. नुकतेच टेस्ला इंडिया मोटर अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडने एक कार्यालय भाड्याने घेतले आहे. या कार्यालयामध्ये कंपनी एक नवीन प्रयोग करण्याची तयारी करत आहे. या प्रयोगामध्ये टेस्ला कंपनी सूर्य प्रकाशावर आधारित इलेक्ट्रिक कार बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच या इलेक्ट्रिक कारच्या माध्यमातून घर उजळून टाकण्याची नवीन संकल्पना देखील टेस्ला (Tesla) कंपनीकडून बनवण्यात येईल. त्यामुळे सर्वांना  टेस्लाचा हा प्रयोग पाहण्याची उत्सुकता लागून राहिली आहे.

Tesla Powerwall प्रकल्प काय आहे?

Tesla कंपनी भारतात Tesla Powerwall तंत्रज्ञान प्रयोग राबविणार आहे. Powerwall ही एक इंटिग्रेटेड बॅटरी सिस्टम आहे. चुकून पॉवर ग्रीड बंद झाले तर बॅकअपसाठी ते उपयोगी पडते. Powerwall हे सूर्याच्या प्रकाशाचे रूपांतर विजेत करून ते तंत्रज्ञान बॅटरीमध्ये साठवते. जेव्हा विदेशी गरज पडते तेव्हा या तंत्रज्ञानाच्या मदतीने वीज प्रवाह सुरू होतो. थोडक्यात हे एक विजेचे एक बॅकअप आहे. या Powerwall वर अनेक घरातील उपकरणे चालू शकतात. ज्यामुळे लाईट नसताना देखील घर उजळून निघते. इतकेच नव्हे तर यामुळे कारच्या बॅटरी देखील चार्ज करता येऊ शकतात.

Tesla Powerwall चे काम काय?

Powerwall हे घराच्या छतावर बसवावे लागते. सूर्याच्या ऊर्जेच्या आधारावर Powerwall ची लिथिनियम बॅटरी चार्ज होते. या बॅटरीचा वापर करून आपण घरातील उपकरणे चालवू शकतो. चुकून जर अचानकपणे लाईट गेली तर याच्या मदतीने आपल्याला लाईटचा वापर करता येऊ शकतो. याच्या आधारावर आपल्याला इलेक्ट्रिक वाहनांची देखील चार्जिंग करता येते. ही बॅटरी आपल्याला एवढा बॅकअप देते की, ज्यामुळे आपण घरातील विजेवरील सर्व कामे करू शकतो.

सध्या Tesla कंपनी भारतात हाच Powerwall राबविण्याच्या तयारीत आहे. मुख्य म्हणजे लवकरच कंपनी काही आठवड्यात इलेक्ट्रिक वाहन तयार करण्यासाठी भारतात फॅक्टरी सुरू करणार आहे. त्यासाठी कंपनीची केंद्र सरकारसोबत चर्चा सुरू आहे. Tesla कंपनी भारतामध्ये तब्बल 24,000 डॉलर म्हणजे जवळपास 20 लाख रुपयांची इलेक्ट्रिक कार बाजारात आणणार आहे. त्यामुळे या इलेक्ट्रिक कारची वाट आतुरतेने पाहिली जात आहे.