Electric Scooter : 2 स्वस्त इलेक्ट्रिक स्कुटर लॉन्च; 47 हजारांपासून सुरू होते किंमत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या बाजारात (Electric Scooter) इलेक्ट्रिक वाहनांची चलती आहे. एक से बढकर एक इलेक्ट्रिक वाहनं आता मार्केटमध्ये येतायत. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय कंपनी GT Force ने दोन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणल्या आहेत. सोल वेगास आणि जीटी ड्राइव प्रो असे या इलेक्ट्रिक स्कुटरचे नाव आहे ज्या कमी अंतराच्या प्रवासासाठी डिझाइन केलेले आहेत. आज आपल्या बाईक रिव्हिव्ह मध्ये जाणून घेऊया या इलेक्ट्रिक स्कुटरची किंमत आणि खास फीचर्स याबाबत …

60 किमी रेंज –

या दोन्ही स्कूटरमध्ये लेड -ऍसिड बॅटरी (Electric Scooter) आणि लिथियम-आयन बॅटरी पॅकचा पर्याय मिळतो. 60V 28Ah लेड ऍसिड बॅटरी असलेली GT सोल वेगास 60 किलोमीटरची रेंज कव्हर करू शकते तर 60V 26Ah लिथियम आयन बॅटरी असलेली स्कूटर 65 किलोमीटरच्या रेंजसह येते. GT ड्राइव्ह प्रो 48V 28Ah लेड ऍसिड बॅटरी आणि 48V 26Ah लिथियम आयन बॅटरीच्या पर्यायासह येते . कंपनीच्या म्हणण्यानुसार, लेड -अ‍ॅसिड बॅटरीसह स्कूटरला पूर्णपणे चार्ज करण्यासाठी आठ तास आणि लिथियम-आयन बॅटरीसह स्कूटर चार्ज करण्यासाठी चार ते पाच तास लागतील.

Electric Scooter

वैशिष्ट्ये – (Electric Scooter)

जीटी सोल वेगासचे वजन 95 किलो (लीड-ऍसिड बॅटरी) आणि 88 किलो (लिथियम-आयन बॅटरी) आहे. ही इलेक्ट्रिक स्कुटर 150 किलो भार वहन करण्यास सक्षम आहे. स्कुटरची ग्राउंड क्लीयरन्स 170 मिमी आहे. स्कूटरला अँटी थेफ्ट अलार्म, रिव्हर्स मोड, क्रूझ कंट्रोल सिस्टीम, इग्निशन लॉक स्टार्ट, टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेंशन (Electric Scooter) आणि ड्युअल ट्यूब रिअर सस्पेंशन मिळते. ग्लॉसी रेड, ग्रे आणि ऑरेंज या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये ही गाडी लॉन्च करण्यात आली आहे.

Electric Scooter

किंमत-

गाडीच्या किमतीबाबत बो(Electric Scooter) लायचं झाल्यास, जीटी सोल वेगासची एक्स शोरूम किंमत 47370 रुपये आहे तर जीटी ड्राइव्ह प्रोची एक्स शोरूम किंमत 67208 रुपये आहे. कंपनी लीड ऍसिड बॅटरी मॉडेल्सला 1 वर्षाची आणि लिथियम आयन बॅटरी पॅकला 3 वर्षांपर्यंतची वॉरंटी देत ​​आहे.

हे पण वाचा :

दसऱ्याला नवीन गाडी घेताय?? पहा जास्त मायलेज देणाऱ्या या बाईक

Flying Bike : अबब!! हवेत उडणारी बाईक; 100 किमी प्रतितास वेग

Dlite RX-100 : Dlite ने सादर केली नवी इलेक्ट्रिक स्कुटर; एका चार्जवर 70 किमी धावणार

HOP OXO Electric Bike : 150 किमी रेंज असलेली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च; पहा किंमत आणि वैशिष्ट्ये