गडचिरोलीत वीजवितरण तारांना चिकटल्याने दोघांचा मृत्यू

0
37
Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मक्यासाठी गमवावा लागला जीव? लोकांमध्ये चर्चा
गडचिरोली प्रतिनिधी

मका पिकाच्या संरक्षणासाठी लावलेल्या तारेच्या कुंपनाला विद्युत प्रवाह सोडण्यात आला होता. या कुंपनाच्या जीवंत तारेला स्पर्श होऊन दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मुलचेरा तालुक्यातील शेतात घडली. रमेश लक्ष्मण आत्राम (३१), दौलत बुच्चा मडावी (४१) दोघेही रा. मुलचेरा असे मृतकांची नावे आहेत. रमेश व दौलत हे दोघेही बुधवारच्या रात्रीपासूनच गायब होते. मात्र होळीचा सण असल्याने एखाद्या ठिकाणी गेले असावे, असा अंदाज घरच्यांनी बांधला. त्यामुळे रात्रभर त्यांची शोधाशोध केली नाही. मात्र गुरूवारी सकाळीही ते परत आले नाही. त्यामुळे त्यांच्या घरच्यांनी शोधाशोध घेतली असता, दोघांचेही मृतदेह रणजीत हलदार यांच्या शेतात आढळून आले.
हलदार यांनी वन्यजीवांपासून मक्याच्या पिकाच्या संरक्षणासाठी शेतासभोवताल तारेचे कुंपन लावले होते. या कुंपनाला त्यांनी विद्युत प्रवाह सोडला होता. दोघांचाही तारेला स्पर्श झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याबाबत शेतमालक रणजित हलदार व जयदेव हलदार यांच्यावर गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक करण्यात आली. या दोघांच्याही विरोधात भादंवि कलम ३०४/३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रमेश आत्राम याला पत्नी, आई-वडील व दोन मुली आहेत. आई-वडील वयोवृध्द आहेत. दौलत मडावी याला मुलगा, मुलगी, असा परिवार आहे. रंगपंचमीच्या दिवशी गावात घटना घडल्याचे उघडकीस आल्याने गावात शोककळा पसरली आहे.

विशेष म्हणजे, दोघेही जनावरे शोधण्यासाठी गेले होते, अशी माहिती मृतकांच्या नातेवाईकांनी दिली. मात्र मक्याच्या शेतीत रात्री १० वाजता दोघेही गेल्याने ते मक्याची कणसे चोरण्यासाठी गेले असावेत अशी चर्चा गावकऱ्यांकडून केली जात आहे. अन्यथा तेवढ्या रात्री शेतात जाण्याचे दुसरे कारण काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here