कराड प्रतिनिधी : सकलेन मुलाणी
सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला विद्युत रोषणाई करताना एका वीज कर्मचाऱ्यांचा शॉक मृत्यू झाला. पाटण तालुक्यातील लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखाना परिसरात नुकतीच ही दुर्घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिंदे गटाचे नेते तथा उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांचा बुधवार (दि. 17) रोजी वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी पूर्वतयारी करण्याची लगबग सध्या कारखाना स्थळावर सुरू आहे.
कारखाना स्थळावर ठिकठिकाणी विदुत शोषणाई करण्याचे कामी केले जात आहे. दरम्यान आज वीज वितरणाचा एक कर्मचारी कारखाना स्थळी विदुत रोषणाई करत होता. यावेळी त्याला जवळून गेलेल्या विदुत तारांचा स्पर्श झाला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. कारखाना कार्यस्थळावर घडलेल्या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.