Sunday, February 5, 2023

2024 पर्यंत महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होणार; संजय राऊतांचे मोठे विधान

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीबाबत मोठे विधान केले. “राज्यात 2024 पर्यंत महाविवकास आघाडीच सरकार येईल आणि महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल, असा दावा त्यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, ‘लढाई संपली असे काही जण म्हणतात. मात्र, त्यांना एवढच सांगतो की, अजून लढाई संपलेली नाही, माझ्यासारख्या माणसाविरुद्ध सतत अशा खोट्या कारवाया होत राहणार हे मला चांगलं माहीत आहे. त्यामुळे ही न संपणारी लढाई आहे. आम्हाला पूर्ण खात्री आहे की, 2024 पर्यंत महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल. हे मी आजच्या दिवशी सांगतो आहे आणि मी माझ्या या भूमिकेवर ठाम आहे. मी बाहेर असेन पण माझ्या भूमिकेवर मी ठाम आहे.

- Advertisement -

पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या खासदार संजय राऊत यांना विशेष न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला. हे प्रकरण आर्थिक गैरव्यवहाराऐवजी केवळ दिवाणी वादाचे असताना संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांना विनाकारण अटक करण्यात आली होती. जमीन मंजूर केल्यानंतर राऊतांनी आता भाजप व शिंदे गटावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे.