येत्या २०२३ पर्यंत औरंगाबाद ते मनमाडचे विद्युतीकरण पूर्ण करणार – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – येत्या २०२३ पर्यंत औरंगाबाद ते मनमाड रेल्वेची इलेक्ट्रिक लाईन पूर्ण करणार आहे. मुख्यमंत्र्यांनी औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजनाच्या दिवशी मागणी केलेल्या औरंगाबाद अहमदनगर, औरंगाबाद पुणे रेल्वे लाईन बाबत प्रस्ताव आला असून लवकरच त्यावर निर्णय घेतला जाईल असे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले. नांदेड रेल्वे डिव्हिजनची बुधवार (२०) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यानंतर केंद्रीय मंत्री दानवे पत्रकार परिषद घेतली. यावेळी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, खासदार इम्तियाज जलील, खा. फोउजिया खान उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना मंत्री दानवे म्हणाले कि, पंतप्रधान मोदींनी देशात रेल्वेचे 7 महत्वाचे प्रोजेक्ट ठरवले आहे. त्यात समृद्धी महामार्ग मुंबई नागपूर रेल्वे मार्ग करण्याचा आमचा प्रयत्न असून त्यासाठी सर्व्हे सुरू देखील सुरु करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या मदतीने हा प्रोजेक्ट पूर्ण करणार आहे. तसेच मराठवाड्यातील प्रलंबित रेल्वे प्रश्न लवकरात लवकर सोडवणार असून पूर्वोत्तर राज्ये राजधानीला जोडण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे दानवे यांनी सांगितले.

मागच्या दोन वर्षांपूर्वी मिटिंग झाली होती. तेव्हा उपस्थित केलेले मुद्दे पुन्हा आज उपस्थित करावे लागले. औरंगाबाद दौलताबाद, मनमाड चाळीसगाव यांना 88 किलोमीटर ची मागणी केली होती, रेल्वे बोर्डाने 2018 ला नामंजूर केल्याचे पत्र दिले. मराठवाड्यासाठी एकही घोषणा केली नाही. असा आरोप खा. जलील यांनी केला. सोबतच कोकणच्या विकासासाठी कोकण रेल्वे डेव्हलपमेंट स्थापन केली होती त्या धर्तीवर मराठवाड्यात व्हायला हवे अशी मागणी जलील यांनी केली. पुढे बोलताना ते म्हणले कि, अजित पवार यांनी वर्षभरापूर्वी 50 टक्के देण्याचे मंजूर केले होते, परंतु रेल्वेने त्याकडे दुर्लक्ष केले. परभणी बंगलोर रेलवे औरंगाबाद पासून सुरू करावी अशी मागणी यावेळी जलील यांनी केली. सोबतच मिटिंग मध्ये फक्त फॉर्मलिटी होणार असेल तर आम्ही आंदोलन करू असा इशारा देखील यावेळी खा. जलील यांनी दिला.

यांना रेल्वे प्रश्न महत्वाचे नाही का ?
बीडच्या भाजप खा. प्रीतम मुंडे, लातूर भाजपचे खासदार सुधाकर शृंगारे, नांदेड भाजपचे खा. प्रतापपाटील चिखलीकर, उस्मानाबाद चे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील हे लोकप्रतिनिधी अनुपस्थित होते. नांदेड वरून बैठक औरंगाबादला बोलावल्यानंतर सुद्धा मराठवाड्याच्या खासदारांनी दांडी मारल्याने लोकप्रनिधींना मराठवाड्याच्या रेल्वे प्रश्नाबाबत महत्व नाही का ? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहे. भाजप खासदारांनी सुद्धा दांडी मारल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Leave a Comment