मनमाड ते मुदखेड रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचा आज शुभारंभ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – मराठवाड्यातील पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी आणि मराठवाड्याला सर्व बाजूने अखंड कनेक्टिव्हिटी देण्यासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मनमाड ते मुदखेड रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणासह रोटेगाव, चिकलठाणा, जालना, परतूर, मानवत रोड, चुडावा या ट्रॅक्शन उपकेंद्रासाठी 484 कोटी रुपये मंजूर केले आहेत. या कामाचा शुभारंभ केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या हस्ते आज जालना रेल्वे स्थानकात होणार आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या पुढाकाराने मनमाड ते मुदखेड रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण झाल्यास रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढणार तसेच रेल्वे मार्गावरील वाहतूक खोळंबा कमी होणार असून इंधनाच्या खर्चात घट होणार आहे. हा प्रकल्प म्हणजे पर्यावरणास अनुकूल असून रेल्वेचा वेग वाढवून रेल्वेगाड्या या मार्गाने जास्तीच्या धावणार आहेत. यामुळे रोजगार मोठ्या प्रमाणात वाढवून प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे, अशी माहिती भाजपचे जालना जिल्हा उपाध्यक्ष भास्करआबा दानवे यांनी दिली.

या कार्यक्रमाला केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, खासदार संजय जाधव, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, खासदार इम्तियाज जलील, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, अंबादास दानवे, कैलास गोरंट्याल, बबनराव लोणीकर, नारायण कुचे, संतोष दानवे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

Leave a Comment